कॅम्प एज्युकेशन सोसायटी आणि पूनावाला फाऊंडेशनच्या वतीने दहावी – बारावीमधील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार आणि गरजू कुटुंबीयांना धान्यवाटप

कॅम्प एज्युकेशन सोसायटी आणि पूनावाला फाऊंडेशनच्या वतीने दहावी – बारावीमधील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार आणि गरजू कुटुंबीयांना धान्यवाटप

कॅम्प एज्युकेशन सोसायटीमध्ये आयोजित या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर पद्मश्री आणि लीला पूनावाला फाऊंडेशनच्या कार्याध्यक्षा लीला पूनावाला, लीला पुनावाला फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त फिरोझ पूनावाला, कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती, फाऊंडेशच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीती खरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला संस्थेचे मानद सचिव बाबुराव जवळेकर, खजिनदार उदय पुंडे, कार्यकारणी सदस्य सुभाष अगरवाल, डॉ. आय. एस. मुल्ला, ॲड. भगवान बेंद्रे आणि शशिकांत पवार, मुख्याध्यापिका दुर्गा देशमुख आदी उपस्थित होते.

कॅम्प एज्युकेशन सोसायटी आणि पूनावाला फाऊंडेशनच्या वतीने दहावी - बारावीमधील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार आणि गरजू कुटुंबीयांना धान्यवाटप
कॅम्प एज्युकेशन सोसायटी आणि पूनावाला फाऊंडेशनच्या वतीने दहावी – बारावीमधील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार आणि गरजू कुटुंबीयांना धान्यवाटप

या वेळी सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांना सामाजिक कार्याबद्दल फिरोज पूनावाला यांच्या हस्ते मानपत्र देण्यात आले. फिरोझ पूनावाला आणि लीला पूनावाला यांना सोसायटीच्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले. या वेळी फाऊंडेशनने दत्तक घेतलेल्या ४० विद्यार्थिनींना स्मार्ट फोन आणि अन्नधान्याचे किट देण्यात आले.
कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती म्हणाले की, ‘‘आधुनिक काळाची गरज ओळखून संस्थेने स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केले आहे. या सेंटरमध्ये समाजातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यासाठी व्यावसायाभिमुख शिक्षण देण्यात येत आहे. त्यामध्ये फॅशन डिझायनिंग, इंटेरियर डिझाइनिंग ब्यूटी पार्लर आणि स्पा एज्युकेशन, हॉटेल मॅनेजमेंट, हाऊस किपिंग व फ्रंट ऑफिस बेकरी प्रॉडक्ट, एज्युकेशन फॉरेन लँग्वेज, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्पोकन इंग्लिश, मोबाईल-लॅपटॉप रिपेअरिंग, अद्ययावत कॉम्प्युटर कोर्सेस अशा विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे. घरात इंग्रजीचा लवलेशही नाही, अशा समाजापर्यंत इंग्रजी भाषा पोहचविण्याचे कार्य कॅम्प एज्युकेशन सोसायटी करीत आहे. ही खऱ्या अर्थाने समाजसेवाच आहे.’’
‘कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या तिन्ही शाळांमधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू ५७३ विद्यार्थिनींना लीला फाऊंडेशनतर्फे दत्तक घेण्यात आले आहे. या मुलींना इयत्ता सातवीपासून ते पदवी शिक्षणापर्यंत फाऊंडेशनतर्फे शिष्यवृत्ती दिली जात आहे. मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज हजारो मुलींचे लीला ‘मॉम’ व फिरोज ‘डॅड’ बनून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. मुलींना लहान वयात मिळणारी ही मदत खूप मोलाची आहे, असे मत वालचंद संचेती यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमांमध्ये ४० मुलींना अन्नधान्याचे किट देण्यात आले. येत्या सोमवारपासून शहरातील तीन हजार गरजू कुटुंबियांना धान्यवाटप केले जाणार आहे. तसेच विविध शाळांमधील एक लाख विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच पेन दिले जाणार आहेत. फाउंडेशनने आता अन्य राज्यांमधील मुलींना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. लवकरच बेंगलोर येथे कार्यालय सुरू होत आहे. त्यानंतर चेन्नई येथे फाऊंडेशनचे कार्यालय सुरू करण्याचा मानस आहे. करोनाच्या काळात फाउंडेशनने अनेक कुटुंबांना धान्यवाटप केले, असे फिरोज पूनावाला यांनी सांगितले.

फाउंडेशनची सुरुवात करण्यात आल्यानंतर पहिल्या पाच वर्षांत १५० मुलींना शिष्यवृत्ती देण्यात येत होती. आता सुमारे ११ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामध्ये कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या तीन शाळांमधील मुलींना शिष्यवृत्ती दिली जाते. फाऊंडेशनचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने देशभरातील मुलींना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. मुलींना स्वावलंबी बनविणे हे फाऊंडेशनचे ध्येय आहे. त्यादृष्टीने कामकाज करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *