MPSC म्हणजे सर्वस्व नाही! – जी. किरण

MPSC म्हणजे सर्वस्व नाही! 

(लेखक Ex Customs Officer,व Ex. Dy. C. E. O आहेत. याच सोबत त्यांनी ९ पुस्तकं लिहली आहेत. जी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत.)

    कुठेतरी अंधारात एक दिवा प्रकाशताना दिसतो आहे मात्र त्या दिव्याचे आपल्या पासूनचे अंतर अंधारामुळे काहीसे समजून येत नाही.. जिद्द तशीच आहे पण त्या दिव्या पर्यंत जाण्याची मनात एक भीती आहे , की किती वेळ लागेल तिथं पर्यंत जाण्यास … अशी काहीशी अवस्था स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांची आत्ता  झालेली दिसून येते.. कोरोनाच्या काळात lockdown मुळे लांबणीवर गेलेल्या परीक्षा व इतर परीक्षा बद्दल ची अनिश्चितता यामुळे खोल मनात कुठेतरी स्वतःचेच अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.. 5- 6 वर्षांपासून अभ्यास करत असलेल्या ह्या मुलांना आत्ता घरी रोज वडिलांचे तोंड पाहिले की शरामल्या सारखे होत असेल ज्या काळात बापाला हातभार लावायचा त्या पण काळात आज पण त्यांच्या हातातोंडाकडे पाहतो आहोत.. आज पर्यंत शाळेत ,कॉलेज मध्ये टॉपर येणारा मी ,सर्व मुलांत एक मान असलेला मी , आज पण स्वतःच्या अस्तित्वासाठी अभ्यासच करतो आहे …. कधी कधी वाटते की का माझा मार्ग चुकीचा आहे का, कित्ती दिवस मी लढायचे , कित्ती दिवस झगडायचे.. वर्गातील इतर मुले परदेशी दौरे करताना त्यांचे FB वरील फोटो पाहिले की मनात हेवा वाटतो आणि स्वतःचाच स्वतःला राग येतो की मी कुठे आहे… आज तर राग येणे पण कमी झाले… अशी अवस्था MPSC करणाऱ्या बऱ्याच जुन्या मुलांची झाली आहे की जी मुले 4- 5 वर्षा पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करतात..

MPSC म्हणजे सर्वस्व नाही! - जी. किरण
MPSC म्हणजे सर्वस्व नाही! – जी. किरण

      “… सध्या ती काय करते” याप्रमाणे  सध्या तुमचा मुलगा अजून अभ्यास च करतो का ? हे शब्द बऱ्याच वेळी नातेवाईकांकडून घरी कानावर पडतात.. आणि अस्तित्वाची जाणीव होते….!!!

          … आणि ह्याच अस्तिवाचा शोध घेताना आत्ताच्या परिस्थितीत पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा राहण्याची गरज आहे.. Mpsc ने परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत, सप्टेंबर-ऑक्टोबर ला होतील की त्या ही पुढे जातील हा प्रश्नच आहे… त्यामुळे अंधारात विचार करत बसण्यापेक्षा इतर पर्याय शोधण्याची आवश्यकता आली आहे.. मी म्हणत नाही अभ्यास सोडा,.. मात्र अभ्यासासोबतच वास्तविक जगात जगायला शिका.. जर  राज्य सरकार कर्ज काढून कर्मचाऱ्यांचे पगार अदा करायचा विचार करते आहे तर परीक्षा कधी घेईल ,नवीन किती जागा काढेल , त्यांना जॉइनिंग कधी देईल आणि मी आयुष्य जगायला कधी सुरू करेल असे बरेच प्रश्न डोक्यात गर्दी करताना दिसतात..

         …  ज्या मुलांनी MPSC त 4- 5 वर्ष घातली आहेत त्यांनी आत्ता वाट पाहू नये.. अभ्यासासोबतच स्वतःची ओळख निर्माण करावी लागेल हे लक्षात घ्या.. चुकून घरचे पण आपणास ओळख देणार नाहीत अशी वेळ येऊ देऊ नका.. फक्त MPSC च्या भरवश्यावर बसू नका.. “रात्र वैऱ्याची आहे वेळीच सावध व्हा..” अस्तित्व शोधताना आपण आपल्याला न्याय देऊ शकू असा Plan- B पण निवडा.. कोरोना मुळे सर्व उद्योगधंदे reshuffle होताना दिसतील.. ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्योगाचा विचार करा, किंवा त्यात चांगली नौकरी मिळवण्याचा प्रयत्न करा.. ज्यांना शक्य असेल त्यांनी  Banking, Insurance,  Central Dept. Exam , UPSC , SSC , SSB , Railway , EPFO अश्या ही इतर परीक्षांचा विचार करावा.. आपली MPSC ची मुले मनात आणले तर कोणतीही exam crack करू शकतात हे लक्षात ठेवा… MPSC म्हणजे एक नौकरीचे, जगण्याचे साधन आहे हे विसरू नका त्याला सर्वस्व बनवू नका..

     …  lockdown मध्ये अभ्यास होत नाही ही समस्या नवीन मुलांसाठी ठीक आहे आणि तसेच FB वर त्यांच्यासाठी खूप लोक video टाकतात की Lockdown मध्ये कसा अभ्यास करावा.. मात्र जुन्या मुलांसाठी हा प्रश्नच योग्य नाही – आज तुम्ही select झाले नाही म्हणून  इथे आहात , नाही तर तुमचे knowledge एखाद्या मार्गदर्शकापेक्षा कमी नाही” .. सध्या समोर Exam Date नाही त्यामुळे समोर  थोडा अंधार जरूर वाटेल मित्रा.. पण हाच कसोटीचा काळ आहे.. आज परत ‘तुमच्यातील मी ‘ ला सिद्ध करण्याची  संधी आली आहे असे समज.. मित्रा चल परत उठ आणि पाळायला लाग.. आत्ता ही लढाई फक्त माझी माझ्याशी आहे असे म्हणून जगाच्या स्पर्धेत उतर… हे जग खूप मोठे आहे, खूप वाटा आहेत.. आणि ह्या सर्व वाटा तुझ्यासाठी परत खुल्या आहेत.. बसं स्वतःचे  अस्तित्व सिद्ध कर….!!!

    Mpsc हे जीवन नाही.. हेच सर्वस्व नाही .. हे कळायला वयाची 32–35 वर्षे उजाडत असतील तर आयुष्यातील बेरीज वजाबाकी मध्ये हातात काहीच शिल्लक राहिलेले नसेल….त्यामुळे  अभ्यासासोबत स्वतःचे अस्तित्व शोधायला शि्का , हीच काळाची गरज आहे…

 

टिप: लेखकांनी फक्त वास्तव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे .. काही लोक त्यांच्या मताशी सहमत ही नसतील त्यांनी याचा विचार करू नये हीच विनंती

 

G.Kiran Ex Customs Officer, Ex. Dy. C. E. O, D.D.R.
G.Kiran
Ex Customs Officer,
Ex. Dy. C. E. O,
D.D.R.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *