राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र पुणे विभागाच्या वतीने अंधजनाचे जनक लुई ब्रेल यांची जन्म जयंती उत्साहात साजरी

राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र पुणे विभागाच्या वतीने अंधजनाचे जनक लुई ब्रेल यांची जन्म जयंती उत्साहात साजरी

राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र पुणे विभागीय शाखेच्या वतीने अंधजनाचे जनक लुई ब्रेल यांच्या जन्म जयंतीचे औचित्य साधत, दृष्टीहीनांसाठी मराठी व इंग्रजी ब्रेल वाचन, सुगम गायन, काव्यवाचन अश्या खुल्या गटातील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

4 जानेवारीला अंधजनाचे जनक लुई ब्रेल यांची जन्म जयंती होती, याचेच औचित्य साधत काँग्रेस भवन शिवाजीनगर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेच्या उदघाट्न प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महानगर पालिकेच्या नगर सेविका सौ प्राची ताई आल्हाट, आशिष आल्हाट, उद्योगपती श्री महेन्द्र जाधव, प्रहार संघटनेच्या वतीने विद्याताई ठिपसे, पोलिस मित्र मंडळाच्या उपाध्यक्षा रूपाताई जाधव उपस्थित होत्या . या स्पर्धेला सर्व अंध बांधवाकडुन उत्तम प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे प्रायोजकत्व युनियन बँक आँफ इंडिया,शिवाजीनगर यांनी केले.

राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र पुणे विभागाच्या वतीने अंधजनाचे जनक लुई ब्रेल यांची जन्म जयंती उत्साहात साजरी
राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र पुणे विभागाच्या वतीने अंधजनाचे जनक लुई ब्रेल यांची जन्म जयंती उत्साहात साजरी

कार्यक्रमाच्या समारोपास प्रमुख पाहुणे म्हणून युनियन बँक आँफ इंडियाचे पुणे पुर्वचे जनरल मँनेजर, गुरू प्रसाद सर आणि रिता इंडिया फाऊंडेशन च्या संस्थपिका रिता शेटीया यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी रिता इंडिया फाऊंडेशन च्या संस्थपिका रिता शेटीया यांच्या तर्फे दृष्टीहिनाना 200 सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.

यावेळी रिता शेटीया म्हणाल्या, या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही दृष्टी हिनांसाठी एक व्यासपीठ निर्माण करून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देत आहात. तुमचे हे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे. अंधजनाच्या समस्या अनेक असुन त्या सोडविण्यासाठी सगळ्यांनी पुढे येऊन सहकार्य करावे, असे संघटनेच्या वतीने आव्हाहन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र पुणे विभागीय शाखा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, उपाध्यक्ष जनार्दन कोळस, महासचिव श्री शिवाजी लोंढे तसेच कोषाध्यक्ष श्री सुशील पाटील, कार्यकारिणी सदस्य श्री प्रकाश नवले, संघटनेचे मानद अध्यक्ष श्री कुलदीप रावळ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महासचिव श्री शिवाजी लोंढे यांनी केले. आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव श्री सदानंद जन्नु यांनी मानले. कार्यक्रमाचे सर्व जबाबदारी आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ पुणे विभागाचे सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *