प्रकाश पवार यांचा शिक्षक मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल !

प्रकाश मारुती पवार यांचा शिक्षक मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल !

      सध्या प्रकाश पवार हे  पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात  राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक असून गेली 25 वर्षे शिक्षण क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.  शिक्षक संघटक नावाची संघटनेतून  प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि वरिष्ठ महाविद्यालयिन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रश्न सोडविन्याचा प्रमाणिक प्रयत्न केला आहे.  संघटनेची व त्यांची प्रमाणिक भूमिका आणि धडपड लक्षात घेऊन बरोबर दोन वर्षांपूर्वी  संघटनेतील काही जुने जानते शिक्षक कार्यकर्ते पवारांना भेटायला गेले होते खूप गप्पा झाल्या नंतर 2020 ला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तुम्ही का उभे राहत नाही? असा त्यांनी पवारांना आग्रह केला पण  त्यावर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

प्रकाश पवार यांचा शिक्षक मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल
प्रकाश पवार यांचा शिक्षक मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल

 यावर पवार म्हणाले,  “पण आपनही निवडणुकीला उभे राहु शकतो का? आणि का रहायचे? हे प्रश्न त्यांच्या मनाला सतावत होतो. दरम्यान कार्यकर्त्यांकडून पुन्हा पुन्हा आग्रह होऊ लागल्यावर मात्र या विषयावर खूप गांभीर्याने विचार केला आणि  असे लक्षात आले की, या निवडणुकीवर संस्थाचालक आणि राजकीय पक्ष यांचे वर्चस्व आहे आपण कुठल्या पक्षाचे नाही आणि आपल्याला कुठली संस्था हि साथ देईल का? याबाबत शंका आहे आणि शिक्षक मात्र या निवडणुकीबाबत कमालीचे उदासीन असतात. हे सत्य असले तरी जो पर्यत कोणीतरी ही परिस्थिति बदलून शिक्षक वर्गाला आपल्या हक्क आणि अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी पुढाकार घ्यायललाच हवा आणि आपण हे करू शकतो  असा विश्वास पवारांना वाटतो आहे. “

“कोणतीही निवडणूक हे आव्हानच असते. मग शिक्षक मतदार संघाची निवडणूक तरी त्याला कशी अपवाद राहिल. गेल्या सत्तर वर्षात महाराष्ट्रात ज्या शिक्षक मतदार संघातल्या निवडणुका झाल्या त्यातल्या एखाद-दोन अपवाद वगळता बहुतेक निवडणुकांवर संस्थाचालकाचेच आणि राजकीय पक्ष वर्चस्व राहिले आहे यामागे निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदार झालेला आणि मतदार न झालेला शिक्षक अश्या दोन्हींही वर्गतील बहुतांश शिक्षक आपले अधिकार, हक्क आणि कर्तव्य याबाबत निष्क्रिय असतात असेही लक्षात आले. त्याचाच ग़ैरफ़ायदा आजपर्यंत विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्या निष्क्रिय उमेदवार यांनी घेतल्याचे दिसून येते. त्यामुळेच शिक्षकांचे कुठलेच प्रश्न मार्गी लागले नाही हे मला स्पष्ट जाणवत होते त्यामुळे ही निवडणूक लढ़विन्याबाबत मी ठामपणे ठरविले.” असे पवार म्हणाले.

     ” निवडणुकीची पूर्वतयारी करत असताना मला पहिला प्रश्न मला पडला की हे मतदारसंघ घटनाकारांनी का तयार केले असावेत? त्याचे उत्तर शोधताना मला असे लक्षात आले की, जेव्हा आपण राज्यघटना स्वीकारली तेव्हा आपल्या समाज अशिक्षित अडाणी होता. विधिमंडळाचे कामकाज दर्जेदार व्हावे त्यासाठी हुशार अभासू प्रतिनिधींची गरज होती पदवीधर ,शिक्षक हे उच्चशिक्षित आहेत ते हुशार अभ्यासू व्यक्तींना निवडून देतील त्याप्रमाणे राज्यात सात पदवीधर आमदार, सात शिक्षक आमदार आणि बारा राज्यपाल नियुक्त असे 24 आमदार विधान परिषदेत असतील (७८ पैकी २४) की जे या सभागृहाची गरिमा उंचावतील गेल्या सत्तर वर्षाच्या इतिहासात एखाद-दोन आमदार अपवाद सोडले तर कोणीही सभागृहाला उंचीवर नेले नाही की पद आणि पात्रतेला साजेशी कामगिरी केली नाही. उलट राजकीय विचार धारा घेऊन शिक्षक आमदार झालेल्या लोकांनी या पदाचे अवमूल्यनच केले आहे. कारण अतिशय खुजे लोक या मतदार संघातून निवडून गेले आहेत त्यामुळे घटनाकारांना अभिप्रेत उद्धिष्ट आजपर्यंत साध्य झालेली नाहीत. ज्या शिक्षकांच्या मतावर ते निवडून गेले त्या शिक्षकांना त्यांनी कधीच सन्मान दिला नाही त्यांचे प्रश्न सोडवले नाही आज शिक्षण क्षेत्रात चांगले लोक यायला तयार नाहीत, हुशार होतकरू लोकांना आपण फसलो आहोत याची खंत वाटते आहे. अतिशय हुशार तरुण विनाअनुदान, तूटपुंजे वेतन, संस्थाचालक,सरकारी कर्मचारी आणि सरकारी अनास्था याच्या सापळ्यात अडकले आहेत अशावेळी ही परिस्थिती बदलण्यासाठी समाजातल्या चांगल्या लोकांनीच निवडणूक प्रक्रियेत योग्य असे योगदान देणे आवश्यक आहे असे वाटू लागल्याने मी ही निवडणुक लढविन्याचा गांभीर्याने आणि ठाम निर्धार केला आहे.” असे पुढे म्हणाले.

      त्यांनी आजवर केलेल्या कामाचा आढावा घेताना असे लक्षात आले की गेल्या पंचवीस वर्षांत दीड हजार लोकांचे वैयक्तिक प्रश्न सोडवले आहेत तर 15 पेक्षा अधिक शासन निर्णय परिपत्रक काढण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे हे सगळे जर विस्तृतपणे शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचवलं आणि त्यांना सक्रिय केलं तर शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल होतील अशी आशा त्यांना वाटते आहे  हीच भूमिका घेऊन पवार ही निवडणूक लढवत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *