भारतीय स्टेट बँकेतर्फे पोलिसांना रेनकोट वाटप

भारतीय स्टेट बँकेतर्फे पोलिसांना रेनकोट वाटप

पुणे : भारतीय स्टेट बँकेतर्फे सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. पुणे पोलीस आयुक्तालयात ४०० पोलिसांना, तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील २०० पोलिसांना रेनकोट देण्यात आले.

भारतीय स्टेट बँकेतर्फे पोलिसांना रेनकोट वाटप
भारतीय स्टेट बँकेतर्फे पोलिसांना रेनकोट वाटप
 
स्टेट बँकेच्या पुणे प्रशासनिक कार्यालयाचे उप महाव्यवस्थापक (व्यवप) जगन्नाथ साहु, पुणे शहर वाहतूक पोलीस आयुक्त राहुल श्रीरामे, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांच्या हस्ते हे रेनकोट वाटप झाले. भारतीय स्टेट बँकेचे संपर्क अधिकारी जयंत सिन्हा यांनी कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केले.
 
जगन्नाथ साहू म्हणाले, “भारतीय स्टेट बँकेतर्फे नेहमीच सामाजिक बांधिलकी म्हणून विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. पुणे, पिंपरीसह महाराष्ट्रातील नांदेड, कोल्हापूर, नागपुर, अमरावती, नशिक, औरंगाबाद, पणजी या प्रशासनिक कार्यालयामार्फतही पोलिसांना रेनकोटचे वापट करण्यात येत आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *